ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

Last Updated: Saturday, January 14, 2012 - 11:25

www.24taas.com ,पर्थ

 

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर  डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली. ऑस्ट्रेलियाची स्थिती चार बाद २९६ रन्स आहे.

 

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

 

पर्थ टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर टीम इंडियाच्या  बॉलर्सनी  आणखी दोन विकेट झटपट घेण्यात यश  मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या  ३ बाद २५६ रन्स झाल्या आहेत. रिकी पॉंटिंगला ७ रन्सवर कॅच आऊट, शान मार्शला ११ रन्सवर तर कोवेनंला  क्लिन बोल्ड उमेश यादवने केले.  तिन्हीही विकेट घेत आपल्याला बॉलिंगची चुणूक दाखवून दिली. कोवेनं ७४ रन्स केल्या. मात्र, टीम इंडियाचे फिल्डींग खराब झाली. काही झेलही सोडले. शतकवीर वॉर्नचा  झेल सोडल्याने त्याने त्याचा पुरेपुर फायदा उठवला आहे.

 


 

पर्थ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला १६१ रन्सवर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी गारद केलं. त्यानंतर ऑसी बॅट्समनी  इंडियाच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेताना एकही विकेट् न गमावता १६४रन्सचा स्कोअर केला आहे. ज्या पिचवर इंडियाच्या बॅट्समनची ऑसी बॉलर्सला खेळताना तारांबळ होत होती. त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं इंडियाच्या बॉलर्सला सळो की पळो करून सोडलं.

 

वॉर्नरनं ८९  बॉल्समध्ये १४  फोर आणि ३ सिक्सच्या जोरावर १११  रन्सची नॉट आऊट खेळी केली. कोवेनं आणि वॉर्नरनं ४८  ओव्हर्समध्ये १४८रन्सची नॉट आऊट ओपनिंग पार्टनरशिप केली. पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व राहिलं. दुसऱ्या दिवशीही या जोडीने चांगली सुरूवात केली आहे. २७  ओव्हर्समध्ये १६४ रन्स ठोकल्या आहेत.  कोवेनं ८९  बॉल्समध्ये ४८  तर  वॉर्नरनं १११ रन्सवर खेळत आहेत.

First Published: Saturday, January 14, 2012 - 11:25
comments powered by Disqus