टीम इंडियासमोर २७० रन्सचे आव्हान

Last Updated: Sunday, February 12, 2012 - 12:57

 www.24taas.com, ऍडलिड

 

ऍडलिड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सीची खेळी केली. तर पिटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ ची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.

 

भारतातर्फे विनय कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन विकेटस घेतल्या तर झहीर खानच्या पदरी एकच विकटे पडली. भारताने कधी नव्हे ते चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना रनआऊट करत तंबुचा रस्ता दाखवला.

First Published: Sunday, February 12, 2012 - 12:57
comments powered by Disqus