टीम इंडियासाठी आता 'करो या मरो'

Last Updated: Saturday, February 25, 2012 - 23:04

www.24taas.com, मेलबर्न

 

सीबी सीरिजची फायनल गाठण्यासाठी भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच जिंकावीच लागणार आहे. टीम मध्ये गटबाजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. आता मैदानाबाहेर चर्चांना पुर्णविराम लावत मैदानावर जबरदस्त कामगिरी करण्याच आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियाची कामगिरी लौकीकाला साजेशी झालेली नाही. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका भारतापेक्षा सरस ठरली आहे.

 

भारताचं फायनल गाठण्याच आव्हान अतिशय खडतर आहे. टीम इंडियाला आपल्या उर्वरित दोन्ही मॅचेस जिंकाव्याच लागणार आहेत. तसंच मोठ्या फरकानं प्रतिस्पर्धी टीमला पराभूत करावं लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच भारतासाठी करो या मरो ठरणार आहे. भारताला या ट्राय सीरिजमध्ये धडाकेबाज ओपनिंग मिळू शकलेली नाही. सेहवाग-गंभीर, सचिन-सेहवाग आणि गंभीर-सचिन अशी वेग-वेगळी ओपनिंग जोडी भारतासाठी यशस्वी ठरू शकलेली नाही. आता, कोणत्या कॉम्बिनेशननं भारतीय टीम मैदानात उतरते ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनी वगळता एकही बॅट्समन क्लिक झालेला नाही.

 

रोहित शर्मा आणि सुरेश रैना टीम मॅनेजमेंटनं दाखवलेला विश्वास सार्थ करू शकलेले नाहीत. बॉलिंगमध्ये झहीर खान अनफिट असल्याचं महेंद्रसिंग धोनीनं स्पष्ट केलं आहे. तर विनय कुमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा हे स्पिनर्सही प्रभावी बॉलिंग करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला सांघिक कामगिरी करत कांगारुंवर मात करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन टीमलाही गमावण्यासारखं काहीच नसणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये एक नवा मॅचविनर त्यांच्या टीममधून समोर येतो आहे. पीटर फॉरेस्ट हा युवा बॅट्समन भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. बेन हिलफेनहॉसकडून भारताला सावध राहव लागणार आहे. त्यामुळे योग्य रणनिती आखून भारताला मैदानात उतरावं लागणार आहे. मैदानाबाहेरील घडामोडी विसरत आता टीम इंडियाला मैदानावर जबरदस्त कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

 

 

 

 

First Published: Saturday, February 25, 2012 - 23:04
comments powered by Disqus