टीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार?

Last Updated: Saturday, July 21, 2012 - 09:53

www.24taas.com, हंबांटोटा

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे लंकेचे खेळाडूही भारताचं आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाली आहे.

 

आयपीएल - ५ नंतर भारतीय टीमला प्रदीर्घ असा विश्राम मिळाला होता. मात्र आता श्रीलंकेतल्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारताच्या नव्या मोसमाची आजपासून सुरूवात होतेय. या मालिकेतला पहिला सामना हंबांटोटामध्ये खेळला जाणार आहे.  ह्या मालिकेत टीम इंडियाचा नक्कीच कस लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आपल्या लौकिकाला साजेस खेळ करेल.

 

श्रीलंकेचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लंकेनं नुकतंच पाकिस्तानविरुद्ध वन डे आणि कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे धोनी ब्रिगेडसाठी हा पहिलाच दिवस अवघड ठरू शकतो. त्यात प्रश्न फक्त या मालिकेचा नाही. इथे आयसीसी वन डे रँकिंगमधलं अव्वल स्थाऩही पणाला लागलं आहे.

 

 

 

 

 

First Published: Saturday, July 21, 2012 - 09:53
comments powered by Disqus