टी-२० चा संग्राम शुक्रवारी!

Last Updated: Thursday, February 2, 2012 - 19:44

www.24taas.com, मेलबर्न

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या टीम इंडियासमोर कांगारूंना पराभूत करण्याचं कडव आव्हान असणार आहे. तर कांगारूं ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत.

 

टेस्टपाठोपाठ पहिल्या टी-20तही दणादाणा उडल्यामुळे आत्मविश्वास गमावलेली टीम इंडिया आता मेलबर्नला कांगारूंविरूद्ध दुस-या टी-20साठी मैदानात उतरणार...ऑस्ट्रेलियात दौ-यात भारतीय बॅटिंग लाईन-अप पूर्णपणे अपयशी ठरलेय.

 

गंभीर-सेहवाग टीम इंडियाला कधी चांगली सुरूवात करुन देतील हाच यक्षप्रश्न भारतीय क्रिकेट फॅन्ससमोर आहे. याचबरोबर बॅट्समनच्या फ्लॉप कामगिरीची मालिका कधी खंडीत होते याचीही प्रतीक्षा क्रिकेट फॅन्सला आहे. तर युवा बॉलर्ससमोर कांगारू बॅट्समनला रोखण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय.

 

पहिल्या टी-20मध्ये दमदार खेळी करणा-या मॅथ्यू वेडबरोबरच डेविड वॉर्नर आणि डेव्हिड हसीला रोखण्याचं आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असेल. तर ब्रेट ली आणि ऑस्ट्रेलिय बॉलर्ससमोर भारतीय बॅट्समनला कस लागणार आहे. आता मेलबर्नमध्ये तरी टीम इंडिया काही चमत्कार करते का याकडेच भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागून राहिल आहे.

First Published: Thursday, February 2, 2012 - 19:44
comments powered by Disqus