ड्रग्स राहुलला भोवणार, दहा वर्ष शिक्षा होणार?

Last Updated: Saturday, July 21, 2012 - 10:48

www.24taas.com, मुंबई

 

क्रिकेटर राहुल शर्मावर बीसीसीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. राहुल शर्माला जुहूतील रेव्हपार्टी भोवण्याची शक्यता आहे. राहुल शर्मा सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. त्याला भारतात पुन्हा बोलावून घेण्याची शक्यता आहे. तसेच त्याला १० वर्षाची शिक्षा होण्याचीही शक्यता आहे.

 

या टिममध्ये राहुल शर्माचाही समावेश आहे. मात्र, जुहूतील रेव्ह पार्टीत राहुल शर्मा हजर होता. या पार्टीत राहुलने ड्रग्ज घेतल्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे राहुलला श्रीलंका दौऱ्यातून बीसीसीआय परत बोलावणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे. रेव्ह पार्टीत राहुल शर्मा सापडल्यानंतर बीसीसीआयने त्याची पाठराखण केली होती.

 

स्वतः राहुलनेही आपण दोषी नसल्याचं त्यावेळी सांगितलं होते. मात्र, आता राहुल दोषी असल्याचं आढळून आल्याने बीसीसीआय कारवाई करणार का, की पुन्हा त्याची पाठराखण करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

 

 

 

 

 

 

First Published: Saturday, July 21, 2012 - 10:48
comments powered by Disqus