पुण्याने दिल्ली केली सर!

Last Updated: Sunday, April 22, 2012 - 14:06

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जेस्सी रायडरच्या तुफानी अर्धशतकाला अल्फान्सो थॉमस (२२ धावांत ३) सौरव गांगुलीच्या घातक गोलंदाजीची (२७ धावांत २) जोड मिळाली आणि पुणे वॉरियर्सने दिल्ली २० धावांनी जिंकली. डेअरडेव्ल्सिचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने ठोकलेल्या ३२ चेंडूत ५७ धावाही दिल्लीला वाचवू शकल्या नाहीत.

 
विजयासाठी १९३ धावांचे खडतर आव्हान पार करताना दिल्लीला ७ बाद १७२ पर्यंत मजल मारता आली. वीरु मैदानावर होता तोपर्यंत दिल्लीला आशा होत्या. तिसर्या षटकात माहेला जयवर्धने बाद झाल्यावर वीरुने केविन पीटरसनच्या (२३ चेंडूत ३ षटकारांसह ३२) ७ षटकात ७५ धावांची भागीदारी करून पुण्याला अडचणीत आणले होते. पीटरसनची दांडी उडवून गांगुलीने हा अडथळा १० व्या षटकात दूर केला. १३ व्या षटकात मुरली कार्तिकने सेहवागचा आपल्या गोलंदाजीवर झेल घेतला आणि पुण्याचा विजय पक्का केला.
तत्पूर्वी, जेस्सी रायडरने सलग दुसरे अर्धशतक ठोकत पुण्याला आयपीएलमधील ३ बाद १९२सर्वोच्च धावसंख्या रचून दिली. दिल्लीच्या गोलंदाजांना त्यांच्या मैदानावर बडवत रायडरने ५८ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८६ धावा चोपल्या. रायडरला कर्णधार सौरव गांगुलीने ३५ चेंडूत ४१ तर स्टिवन स्मिथने १३ चेंडूत ३४ धावा (४ चौकार २ षटकार)ठोकत झकास साथ दिली. रॉबिन उथप्पा चौथ्याच षटकात १० धावा काढून बाद झाला. मोर्नी मोर्केलने विकेटकिपर ओझाकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले.

 
रायडर आणि गांगुली दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले. १०.३ षटकात ९२ धावांची भागीदारी करून त्यांनी पुण्याला भक्कम स्थितीत नेले. १२ व्या षटकातच पुण्याची शंभरी फलकावर लागली होती. मोर्केलने मग गांगुलीला बाद करून १५ व्या षटकात ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या स्मिथने मग दिल्लीकरांना मनसोक्त धुतले. या जोडीने ५.२ षटकातच ६७ धावांची भागीदारी केली. शतकाच्या प्रयत्नात चुकीचा फटका मारत रायडर शेवटच्या षटकात बाद झाला. ही विकेटही मोर्केलनेच घेतली. पुण्याच्या तिन्ही विकेट मोर्केलने घेतल्या व त्यासाठी ५० धावा मोजल्या.First Published: Sunday, April 22, 2012 - 14:06


comments powered by Disqus