भारताचा दणदणीत विजय

Last Updated: Wednesday, August 8, 2012 - 10:48

www.24taas.com, पल्लिकेले
 
भारतानं लंका दौ-याचा शेवटही विजयाने केलाय. लंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतही भारतानं 39 रन्सने जिंकलीय. भारतानं ठेवलेल्या 156 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम 116 रन्सवर गारद झाली. भारताकडून इऱफाननं 3 तर दिंडानं लंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.
 
तत्पूर्वी भारतानं लंकेसमोर 156 रन्सचे आव्हान ठेवलं..टीम इंडियाकडून विराट कोहलीनं 48 बॉल्समध्ये 68 रन्सची खेळी केलीय.त्यानं 11 फोर आणि 1 सिक्स खेचला..तर सुरेश रैनानं 25 बॉल्समध्ये 34 रन्सची नॉट आऊट खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 155 रन्स केलेत.156 रन्सचं टार्गेट घेवून मैदानात उतरलेल्या लंकेला भारतानं सुरुवातीलाच धक्के दिलेत.
 
पठाणनं दिलशानला शून्यावर तर थरंगाला 5 रन्सवर आऊट करत लंकेची 2 आऊट 14 अशी बिकट अवस्था केली.त्यानंतर धोकादायक जयवर्धनेलाही इरफाननं लंकेचे 35 रन्स असताना आऊट करत भारताची पकड मजबूत केली...First Published: Wednesday, August 8, 2012 - 10:48


comments powered by Disqus