भारताची श्रीलंकेवर २१ रन्सनं मात

Last Updated: Tuesday, July 24, 2012 - 10:22

www.24taas.com, हंबांटोटा

 

भारत आणि श्रीलंका यांच्‍यात वन डे क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्‍या वन डेमध्‍ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  टीम इंडियाने श्रीलंकेसमोर ३१५ रन्सचं आव्‍हान ठेवलंय. आज उपकर्णधार विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकलीय तर सेहवागची सेंच्युरी होता होता राहिली त्यानं ९६ रन्स केले.  सुरेश रैनाचे अर्धशतक व कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या उपयुक्‍त अशा २९ चेंडूत ३५ धावांमुळे भारतानं निर्धारित ५० ओव्हर्समध्ये सहा बाद ३१४ रन्स केले.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अष्‍टपैलू इरफान पठाणला संधी दिली आहे. तर श्रीलंकेने रंगना हेराथचा अंतिम अकरामध्‍ये समावेश केला आहे. भारताकडून विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर डावाची सुरुवात करणार आहेत. त्‍यामुळे अजिंक्‍य रहाणेला संधी मिळाली नाही. तर भारताने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यामुळे भारत लंकेसमोर किती रनचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

टीम  भारत 

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली (उपकर्णधार), उमेश यादव, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, जहीर खान, आर. आश्विन, प्रग्यान ओझा.

 

टीम श्रीलंका 

जयवर्धने (कर्णधार), मॅथ्यूज (उपकर्णधार), थरंगा, दिनेश चांदीमल, नुवान कुलशेखरा,तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, लसिथ मलिंगा, रंगना हेराथ, थिसारा परेरा, थिरीमाने.

 

 

 

 

 First Published: Tuesday, July 24, 2012 - 10:22


comments powered by Disqus