भारताच्या लागोपाठ दोन विकेट

भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. उपूल थिरंगा आणि तिलकरत्ने दिलशान मैदानावर उतरले आहेत.

Updated: Jul 28, 2012, 10:18 PM IST

www.24taas.com, कोलंबो

 

भारताला लागोपाठ दोन धक्के बसले आहेत. अवघ्या ३१ रन्सवर महेंद्रसिंग धोनीला बाद केलं तर त्यानंतर ताबडतोब रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला आहे. या आधी रंगना हेराथने विराट कोहलीला स्‍वतःच्‍याच गोलंदाजीवर झेलबाद केले. गौतम गंभीरने मात्र अर्धशतक केलं आहे. या आधी थिशारा परेराने डावाच्‍या दुस-याच षटकात धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागला बाद करुन भारताला मोठा धक्‍का दिला. विजयासाठी 287 धावांचे आव्‍हान घेऊन टीम इंडियाचे फलंदाज मैदानात उतरले आहेत.

 

अष्‍टपैलू अँजेलो मॅथ्‍यूज आणि जीवन मेंडीस यांच्‍या आक्रमक फलंदाजीमुळे श्रीलंकेने अखेरच्‍या षटकांमध्‍ये खो-याने धावा काढल्‍या. त्‍यांच्‍या फटकेबाजीच्‍या जोरावर श्रीलंकेने भारताला धावांचे 287 आव्‍हान दिले. मॅथ्‍यूजने तडाखेबाज अर्धशतक ठोकले. त्‍याला मेंडीसने अप्रतिम साथ दिली. मॅथ्‍यूजने 57 चेंडुंमध्‍ये नाबाद 71 तर मेंडीसने 40 चेंडुंमध्‍ये नाबाद 45 धावा काढल्‍या. अखेरच्‍या षटकांमध्‍ये दोघांनी तुफान फटकेबाजी करुन टीम इंडियाच्‍या गोलंदाजांना जेरीस आणले.

 

भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.

 

लाईव्ह स्कोर जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा 

 

 

टीममधले बदल :

भारत

भारतीय टीममध्ये लेग स्पिनर राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांचा आजच्या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. तर प्रज्ञान ओझा आणि उमेश यादव आज मैदानाच्या बाहेर असतील.

श्रीलंका

श्रीलंकन टीममध्ये जीवन मॅन्डीज याला आजच्या मॅचसाठी संधी मिळालीय. तर लाहिरी थिरमाने आजच्या टीममधून बाहेर आहे.     

 

.