मॅच झाली 'टाय' हाती मात्र काहीच 'नाय'

अॅडलेड येथे झालेल्या भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका मॅच टाय झाली. भारताने १ विकेट बाकी ठेऊन श्रीलंकाविरूद्ध मॅच टाय करण्यात यशस्वी झाले आहेत.

Updated: Feb 14, 2012, 05:15 PM IST

www.24taas.com, अॅडलेड 

 

अॅडलेड येथे झालेल्या भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका मॅच टाय झाली. भारताने १ विकेट बाकी ठेऊन श्रीलंकाविरूद्ध मॅच टाय करण्यात यशस्वी झाले आहेत. भारत ५० ओव्हरमध्ये २३६ रनच करू शकले. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली  होती त्यामुळे मॅच अत्यंत उत्कंठावर्धक झाली होती. पण कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपली जबाबदारी योग्य रितीने वठवली. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी ९ रन हवे होते. मात्र मलिंगाने विनय कुमारला रनआऊट करून भारतासमोर पेच निर्माण केला.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

शेवटच्या बॉलवर भारताला जिंकण्यासाठी ४ रन हवे होते. मलिंगाने टाकलेला जोरदार बॉल धोनीने देखील तितक्याच जोरात टोलावला. मात्र श्रीलंकन खेळाडूंनी फोर अडवला. त्यामुळे धोनी फक्त ३ रन घेऊ शकला. त्यामुळे भारताचा आणि श्रीलंकेचा स्कोर बरोबर झाला.

 

त्यामुळे या मॅचमध्ये कोणाचाच हाती काहीच लागले नाही. त्यामुळे दोन्ही टीमला समान गुण मिळणार आहे. पण भारताकडे आता ९ गुण आहेत. पण या मॅचमध्ये देखील धोनीने चमकदार कामगिरी केली. त्याने ६९ बॉलमध्ये ५८ रन करत आपलं अर्धशतक पूर्ण केले. त्यात ३ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.

 

श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताला पाचवा धक्का बसला आहे. सलामीचा बॅट्समन गौतम गंभीर ९१ रनवर रनआऊट झाला. कुलशेखराने त्याला रनआऊट केले. गंभीरने १०६ बॉलमध्ये ९१ रन केले. त्या ६ फोरचा समावेश होता. तर गेल्या ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या वन डे मध्ये तो ९२ रनवर आऊट झाला होता.

लागोपाठ दोनही वन डे मॅचमध्ये गंभीर शतकाजवळ पोहचून शतकांची मजा चाखू शकला नाही. दोन्हीवेळी गंभीरला शतकाने हुलकावणी दिली. मात्र त्याने मॅच जिंकून देण्याच्या अपेक्षा जिवतं ठेवल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ४३ बॉलमध्ये आणखी ५६ रनची गरज आहे. धोनी ३१ रनवर खेळतो आहे तर जडेजा १ रनवर खेळतो आहे.

 

भारत २३६ रनचा पाठलाग करताना ४ विकेट गमवल्या असल्या तरी गंभीरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या सामन्यात त्यांचे शतक काही होऊ शकले नव्हते. गंभीर एक बाजू लावून धरली आहे. थोड्या थोड्या अंतराने भारताच्या विकेट जात असताना गंभीरने संयमी खेळी खेळत आहे. ६० बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले त्यात ४ फोरचा समावेश आहे.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये २३६ रनचा पाठलाग करताना भारताने आतापर्यंत १०२ रन करून तीन विकेट गमावल्या आहेत. सचिन आणि गंभीर यांनी डावाला सुरवात केली. पण गेल्या काही सामन्याप्रमाणेच सचिनने पुन्हा एकदा सगळ्यांची निराशच केली. तो फक्त १५ रन करून माघारी परतला. त्याला  कुलशेखराने आऊट केले. त्यानंतर आलेला विराट कोहली हा देखील कमाल करू शकला नाही. त्याला परेराने एलबीडब्लू केलं तो १५ रनवर आऊट झाला. तर रोहित शर्मा हा देखील १५ रनवरच रन आऊट झाला. तर रैना फक्त ८ रनवर आऊट झाला

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान आज दुसरी वन डे अॅडलेडमध्ये सुरू आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

 

गेल्या काही मॅचमध्ये टीम इंडियाच्या फिल्डिंगचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे टीम इंडियाला याचा मोठा फायदा झाला आहे. आज देखील इंडियाने चांगली फिल्डिंग करत श्रीलंकेच्या ३ बॅट्समनला रनआऊट केले. त्यामुळे ५० ओव्हर मध्ये ९ विकेट गमावून श्रीलंकेने २३६ रनपर्यंतच मजल मारली. श्रीलंकेकडून चंदीमलने सर्वाधिक ८१ रनची खेळी केली. तर भारताकडून विनयकुमारने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

 

चौथ्यापाठोपाठ श्रीलंकेची पाचवी विकेटही गेली आहे. रोहित शर्माच्या बॉलिंगवर चांडिमल ८१ रन्सवर धोनी तर्फे झेलबाद झाला आहे.  श्रीलंकेची चौथी विकेट गेली. विनय कुमार