युवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन

Last Updated: Wednesday, February 29, 2012 - 10:28

www.24taas.com, मुंबई

अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.

भारताने मिळवलेल्या विजयामुळेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियातील वन-डे मॅचेसच्या फायनल्समध्ये टिकून राहिली आहे.

“चिकू कोहलीचा जबरदस्त खेळ ! झोपण्यापूर्वी श्रमपरिहारासाठी चिकू शेक पी. गुड नाईट” असं युवराजने ट्विटर पेजवर लिहीलंय. विरट कोहलीला त्याचे मित्र चिकू या नावाने संबोधतात.



First Published: Wednesday, February 29, 2012 - 10:28


comments powered by Disqus