राया मला एक शतक अजून हवं – अंजली तेंडुलकर

Last Updated: Wednesday, March 28, 2012 - 16:38

www.24taas.com, मुंबई

 

सचिन तेंडुलकरने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावली. यातील शंभरावं शतक त्याने आपला भाऊ अजित तेंडुलकरला समर्पित केले आहे. पण आता सचिननं पुढचं शतक म्हणजे, १०१ वे शतक माझ्यासाठी करावे असा हट्ट इच्छा सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरने केला आहे.

 

सचिनच्या महाशतकानिमित्त त्याचे अभिनंदन करण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी अंजली बोलत होती. सचिनच्या १००पैकी ९९ शतकांच्या वेळी मी हजर होते. आता मी प्रेक्षकांत असताना सचिनने शतक करावे म्हणजे मी त्याच्या पाहिलेल्या शतकांचे शतक पूर्ण होईल.
मग सचिनने आनंदाने निवृत्त व्हावे असेही ती म्हणाली. गेले वर्ष सचिनसाठी थोडे कठीण गेले, कारण शंभराव्या शतकाचा दबाव त्याच्यावर होता असेही तिने सांगितले.

 

 

 

दरम्यान, जब सचिनसर घुमा के शॉट मारते है तो तुम नही समझोगी अंजली कुछ कुछ होता है, हे वाक्य दुसऱ्या तिसऱ्या कुणी म्हटलेलं नसून लाखों जवाँ दिलों की धडकन दस्तुरखुद्द प्रियांका चोप्राने ही गुगली टाकली.

 

 

मुकेश  आणि नीता अंबानींनी सचिनच्या शतकाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजलेल्या पार्टीला देशभरातल्या दिग्गजांनी हजेरी लावली होती यात नवल ते काहीच नाही. एकतर अंबांनींच्या घरचे आमंत्रण आणि त्यात सचिनच्या शतकाचे निमित्त असा योग दुर्मिळात दुर्मिळच की. बॉलिवूडचे तारा-तारका राजकारणातील अथीरथी महारथी, सोशलाईटस यांनी या शानदार पार्टीला हजेरी लावली.

 

 

संगीतकार प्रितमने सचिनला एक गाणं समर्पित करत शोची सुरुवात केली आणि त्यानंतर प्रियांकाची एण्ट्री झाली. मास्टर ब्लास्टर बद्दल बारीकसारीक तपशील सांगत प्रियांकाने सगळ्यांना प्रभावीत केलं. पण कळसाध्यय चढवला तो आमीर खानने. आमीरने सचिनच्या शंभराव्या शतकाबद्दल आपल्याला खात्री होती आणि २००४ सालीच मुकेश अंबानी यांनी सचिन १०० वे शतक झळकवेल, असं भाकित केलं होतं असं सांगितलं.

 

 

सचिनच्या सर्वात मोठ्या फॅन असलेल्या लता मंगेशकरांनी त्याच्याशी राज ठाकरेंच्या घरी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण जागवली. पण खरी धमाल उडवली ती सलमान खानने. सलमान खानने स्टेजचा ताबा घेतला आणि आपल्या करिष्म्याने आणि वाक्चातुर्याने उपस्थितांना खळखळून हसवलं. हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी एकत्र हजेरी लावली.

 

 

जाँटी ऱ्होडस, परमेश्वर गोदरेज आणि विजय मल्या यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, विरेंद्र सहवाग, हृतिक आणि सुझान रोशन, अभिषेक आणि ऐषवर्या राय बच्चन, राजू हिरानी, विधु विनोद चोप्रा, प्रिटी झिंटा, शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा, रितेश आणि जेनेलिया देशमुख हे देखील पार्टीला उपस्थित होते.First Published: Wednesday, March 28, 2012 - 16:38
TAGS:


comments powered by Disqus