राहुल द्रविड निवृत्तीची घोषणा करणार?

Last Updated: Thursday, March 8, 2012 - 16:36

www.24taas.com, बंगळुरु

 

द वॉल या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नावाजलेला भारतीय मिडल ऑर्डर बॅट्समन राहुल द्रविड कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मागील वर्षी द्रविडने इंग्लंड दौऱ्यातच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती.

 

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सिरीजमध्येही राहुल द्रविड फ्लॉप ठरला होता. या सिरीजमध्ये द्रविड तब्बल सात वेळा क्लिन बोल्ड झाला होता. आता खराब फॉर्ममुळेच राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे. राहुल द्रविड या संबंधीची अधिकृत घोषणा शुक्रवारी बंगळुरु येथे बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत करेल अशी शक्यता आहे.

 टीम इंडिया अडचणीत सापडली की सर्वांना राहुल द्रविडची आठवण होते. पिचवर एका बाजून खंबीर उभे राहणे, चौथ्या इनिंगमध्ये आव्हानात्मक स्कोअरचा पाठलाग करणे, ओपनर नेहमी प्रमाणे जखमी असले की इनिंगची सुरुवात करणे... किंवा टीमला गरज असली तेंव्हा विकेट किपर बनणे असा प्रत्येक रोल राहुल द्रविडनं यशस्वीपणे पार पाडलाय.राहुल टीमसाठी नेहमीच संकटमोचक ठरलाय.... 2011मध्ये इंग्लंड दौ-यातही टीम इंडियाच्या बॅट्समननी सुमार कामगिरीचा कळस गाठला होता. या सर्व मानहानीकक पराभवातही राहुल द्रविडनं दिलेली झुंज सर्वांनाच दिर्घ काळ लक्षात राहणार आहे;

सर्वच बॅट्समन फ्लॉप होत असताना द्रविडनं 4 टेस्टमध्ये 76.83 च्या सरासरीनं तब्बल 461 रन्स काढले. यामध्ये 3 शानदार सेंच्युरींचाही समावेश आहे.

टेस्ट सीरिजमधला ह्या शानदार फॉर्ममुळे द्रविडची वन-डे आणि T-20 टीममध्ये निवड करण्यात आलीय.वास्ताविक युवा प्लेयर्सना संधी मिळावी यासाठी T-20 मध्ये न खेळण्याचा निर्णय द्रविडनं चार वर्षांपूर्वीच घेतला होता.त्यामुळे त्यानं आजवर एकही आंतरराष्ट्रीय t-20 खेळलेली नाही.  मात्र या T-20 मॅचपूर्वीच गौतम गंभीर जखमी झाला आहे. वीरेंद्र सेहवाग यापूर्वीच माघारी परतलाय. तर सचिन तेंडुलकरही t-20 मध्ये खेळण्याची शक्यता नाहीये... त्यामुळे टीमच्या बॅटिंग ऑर्डरला मजबूती देण्यासाठी पुन्हा एकदा राहुल द्रविड हा एकमेव पर्याय टीम मॅनेंजमेंटसमोर उरला आहे. त्यामुळे टीम हिताचा विचार करत आपला जूना निर्णय बाजूला ठेवून वयाच्या 38 व्या वर्षी आपली पहिली आणि शेवटची T-20 मॅच खेळण्यास राहुल द्रविड सज्ज झाला आहे.

 

 

 

 

First Published: Thursday, March 8, 2012 - 16:36
comments powered by Disqus