लंका दौऱ्यात भारताची विजयी सलामी

Last Updated: Saturday, July 21, 2012 - 23:49

www.24taa.comहंबांटोटा

टीम इंडियानं लंका दौऱ्याची सुरुवात विजायानं केलीय. भारतानं लंकेला २१ रन्सनं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.

 

टीम इंडियाचा स्‍टार सलामीवीर वीरेंद्र सेहवाग कारकीर्दीतील आपले १६ वं शतक करण्‍यापासून फक्‍त ४ रन्स कमी पडले. त्यानं ९६ रन्स केले. यामध्‍ये त्‍याने १० चौकारही मारले. अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेला रैनानं पुन्‍हा एकदा रंगात येऊन हाफ सेंच्युरी मारली. कॅप्टन धोनीनही ३५ रन्स दिले आणि दोघांनी ७९ रन्सची भागीदारी केली. भारतानं ५० ओव्हर्समध्ये तब्बल ३१५ रन्सचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला.

 

टीम इंडियाच्या विजयाचा हिरो पुन्हा एकदा ठरला तो विराट कोहली. ३१५ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराबच झाली. दिलशानला इरफाननं  अवघ्या सहा रन्सवर आऊट करत लंकेला सुरुवातीलाच धक्का दिला. भारतीय बॉलर्सनी सुरुवातीपासून लंकनं बॅट्समनच्या फटकेबाजीची संधी दिली नाही आणि ठराविक अंतरावर लंकेच्या विकेट घेतल्या. मात्र, एकाबाजून कुमार संगकारा लंकेचा किल्ला लढवत होता.  त्यानं १३३ रन्सची झुंजार खेळी केली. पण ती व्‍यर्थ ठरली. त्‍याला संघाला विजय मिळवून देता आला नाही अखरे उमेश यादवनं त्याला बोल्ड करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताडून पठाण, अश्विन आणि यादवनं प्रत्येकी २ विकेट्स घेत लंकेला २९३ रन्सवरच रोखलं आणि भारतानं सलामीची लढत २१ रन्सनं जिंकत सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतली.

 

.

First Published: Saturday, July 21, 2012 - 23:49
comments powered by Disqus