लंका 'बॅकफूटवर', इंडियाचं 'गुड वर्क'

Last Updated: Tuesday, February 21, 2012 - 13:19

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅच मध्ये श्रीलंकेने चांगली सुरूवात केली, मात्र भारतीय बॉलरने झोकात पुनरागमन करत श्रीलंकेच्या खेळाडूंना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं आहे. जयवर्धने आणि दिलशाना यांनी सुरूवातीलाच टीम इंडियावर प्रहार करण्यास सुरवात केली. श्रीलंकेच्या आतापर्यंत ४ विकेच मिळविण्यात भारतीय बॉलरांना यश आलं आहे

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

जयवर्धने ४५ तर दिलशान ५१ रनची खेळी करून टीमला चांगली सुरूवात दिली पण हे दोघं आऊट झाल्यावर कॅप्टन संगकारा देखील लगेचच माघारी परतला. त्यामुळे भारताने आता पुन्हा मॅचवर पकड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. इरफान पठाण, २ विकेट घेतल्या तर उमेश यादव आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. इरफान पठाणने जयवर्धनेला सेहवागकरवी आऊट केले तर घातक दिलशानला आश्विनने आपलं शिकार बनवलं.

 

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंका भक्कम स्थितीत आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. डावाची सुरवात करण्यासाठी आलेल्या जयवर्धने आणि दिलशान यांनी त्यांच्या कॅप्टनचा निर्णय देखील सार्थ ठरवला. पहिल्या १५ ओव्हरपर्यत श्रीलंकेने त्यांची एकही विकेट गमावली नाही.

 

तसचं  १५ ओव्हरपर्यंत त्यांनी ७० रन इतकी मजल मारली होती. त्यामुळे श्रीलंका सध्या तरी भक्कम स्थितीत असल्याचे दिसते. तर भारतीय बॉलर अगदीच निष्प्रभ ठरले. त्यांना श्रीलंकेची एकही विकेट झटपट घेता आली नाही. त्यामुळे आता श्रीलंका कुठवर मजल मारणार यावरच सामान्याचा निकाल लागणार आहे.

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान  आज  तिसरी वन डे मॅच सुरू आहे. श्रीलंकेने पहिले टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. या आधी झालेल्या ऑस्ट्रेलिया सोबतच्या वन डे मॅच दरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे महेंद्रसिंह धोनी याला एका वन डे मॅचला मुकावं लागलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये भारताचं नेतृत्व सेहवाग करणार आहे.

 

 श्रीलंका : 195/4 (ओव्हर 39 .0)

इंडिया : 0/0 (ओव्हर 0.0)

 

First Published: Tuesday, February 21, 2012 - 13:19
comments powered by Disqus