लंकेची खराब सुरवात, टीम इंडियाच्या धडकी मनात

Last Updated: Tuesday, March 20, 2012 - 16:01

 

www.24taas.com, मीरपूर

 

मीरपूर येथे एशिया कपसाठी सुरू असलेल्या  श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या वन-डे मॅचमध्ये बांग्लादेशने पहिले टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. आज बांग्लादेश आणि श्रीलंका ही भारतासाठी महत्त्वाची आहे, जर का आज बांग्लादेश पराभूत झाला तरच भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे श्रीलंकेने आज बांग्लादेशला हरवणं गरजेचं आहे.  

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

पण श्रीलंकेची सुरवात मात्र खराब झाली आहे. श्रीलंकेचे महत्त्वाचे तीनही बॅट्समन आऊट झाले आहेत. संगकारा, दिलशान आणि जयवर्धने हे झटपट आऊट झाले असल्याने श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे बांग्लादेश फायनलमध्ये धडक मारण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार. त्यांनी लंकेच्या बॅट्समनना चांगलच जखडून ठेवलं आहे.

 

तीन महत्त्वाचे बॅट्समन आऊट झाल्यानंतर कपुगेदरा आणि थिरीमाने यांनी लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीलंका एशिया कपमध्ये एकही मॅच जिंकू शकलेलं नाही. त्यामुळे लंका देखील ही मॅच जिंकंण्यास प्रयत्नशील असेल.

 

श्रीलंका  : 94/3 (ओव्हर 26.0)

बांग्लादेश : 0/0 (ओव्हर 0.0)

 

 

First Published: Tuesday, March 20, 2012 - 16:01
comments powered by Disqus