लंकेच्या शंभरीत ३ विकेट

Last Updated: Wednesday, February 8, 2012 - 13:42

www.24taas.com, पर्थ

 

श्रीलंकेने डावाला चांगली सुरूवात केली होती. चांगली धावसंख्या उभी राहत असताना २६ रन्सवर कुमार संगकारा आऊट झाल्याने लंकेला दुसरा धक्का बसला. श्रीलंकेने १०० रन्स केल्या आहेत. दिलशान ४८ रन्सवर आऊट झाला.

 

 

 मॅचचे लाईव्ह अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.

 

 

संगकाराने तिलकरत्‍ने दिलशानसोबत ६२ धावांची भागीदारी केली. सलामीवीर उपुल थरंगालाही झहीरनेच बाद केले. थरंगा ४ धावा काढून तंबूत परतला. झहीरला समोर येऊन फटकाविण्‍याच्‍या नादात पहिल्‍या स्लिपमध्‍ये त्‍याचा झेल गेला. सचिनने हा झेल सहज टिपला. त्‍यानंतर तिलकरत्‍ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी अर्धशतकी भागीदारी करुन श्रीलंकेचा डाव सावरला. दिलशानने स्थिरावल्‍यानंतर आक्रमक पावित्रा घेऊन फटकेबाजी केली.

 

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मॅच पर्थमध्ये सुरू झाली असून श्रीलंकेने टाॅस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २ विकेटच्या जोराव १०० रन्स केल्या आहेत. दुसरही विकेट झहीरने काढली. श्रीलंकेला पहिला धक्का झहीर खानने दिला. त्यांने सचिन तेंडुलकरद्वारे थरंगाला कॅच आऊट केले.पहिल्या मॅचमध्ये कांगारूंकडून पराभव सहन कराव्या लागलेल्या टीम इंडियाकडे सीरिजमध्ये कमबॅक करण्याची नामी संधी आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंका आमने-सामने आले आहेत.


श्रीलंका

100/3 (24.3 ov)

 



First Published: Wednesday, February 8, 2012 - 13:42


comments powered by Disqus