सचिन खासदार होणार?

Last Updated: Friday, April 27, 2012 - 08:40

www.24taas.com, नवी दिल्ली

 

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला काँग्रेसकडून राज्यसभेची ऑफर दिल्याची चर्चा आहे. सचिननं सहकुटुंब आज सोनिया गांधींची 10 जनपथवर भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला हेही उपस्थित होते.

 

या भेटीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

पंतप्रधानांनीही याबाबतचं पत्र गृहमंत्रालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं आता क्रिकेटच्या रणमैदानातला विक्रमादित्य खासदार होणार का, याची चर्चा दिल्लीच्या राजकीय पटलावर रंगू लागलीय.

First Published: Friday, April 27, 2012 - 08:40
comments powered by Disqus