‘मास्टर ब्लास्टर’ने भरला दंड

Last Updated: Monday, November 14, 2011 - 08:19

 

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरकडे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसताना दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन घरात रहायला गेला होता. त्यामुळे त्याला करण्यात आलेला ४.३५ लाखांचा दंड सचिनने बुधवारी भरला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

बांद्रा येथील पेरी क्रॉस रोड येथे सचिनने आपल्या स्वप्नातील पाच मजली घर उभारले आहे. कोणत्याही घरात रहायला जाण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, सचिनने ते सादर न केल्यामुळे मुंबई महापालिकेने त्याला ४.३५ लाखांचा दंड ठोठावला होता.

 

सचिनने बांधलेल्या ८३५ चौरसफुट क्षेत्रफळाच्या आधारे त्याला हा दंड करण्यात आला आहे. या दंडात मुंबई महापालिकेकडून सचिनला कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.

First Published: Monday, November 14, 2011 - 08:19
comments powered by Disqus