मनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबन

Last Updated: Wednesday, March 20, 2013 - 16:59

www.24taas.com, मुंबई
मनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. यात मनसे आमदार राम कदम यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आता पक्ष आणि पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे राम कदम यांच्यावर काही कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तर
आमदार राम कदम यांचे सगळ्यात आधी निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. त्याचवेळेस राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते.

मारहाणीच्या या प्रकरणात मात्र राम कदम यांच्यावर मात्र पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत चार जणांवरही कारवाई केली गेली आहे, तसेच या पाचही आमदारांना कोणत्याही क्षणी अटकेला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पक्ष आमदारांवर कारवाई करणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Wednesday, March 20, 2013 - 16:59
comments powered by Disqus