दोन्ही आमदार जाणार `जेल`मध्ये....

Last Updated: Friday, March 22, 2013 - 17:10

www.24taas.com, मुंबई
आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना मारहाण प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचसोबत या दोन्ही आमदारांना २ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये काढावे लागणार आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दोन्ही आमदारांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन कोर्टाने सोमवारपर्यंत राखून ठेवल्याने दोन्ही आमदारांना आता ऑर्थर रोड जेलमध्ये दोन दिवस काढावे लागणार आहे.
आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कदम आणि ठाकूर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

First Published: Friday, March 22, 2013 - 17:09
comments powered by Disqus