ऑस्ट्रेलिया टीमचा हैदराबादला न जाण्याचा निर्णय

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, February 21, 2013 - 22:19

www.24taas.com,चेन्नई
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये उद्या शुक्रवारीपासून क्रिकेट कसोटी सामने सुरू होत आहेत. उद्या चेन्नईत सामना होत आहे. मात्र, २ मार्च रोजी होणाऱ्या हैदराबादमधील कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादमध्ये दोन शक्तीशाली स्फोट झाल्याने देशातील महत्वाच्या शहरांत हायअर्लट जारी करण्यात आले आहेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार तर ५० जण जखमी झालेत. बॉम्बस्फोटासाठी सायकरलचा वापर करण्यात आला. त्यामुळे सुरक्षितेच्या कारणामुळे ऑस्ट्रेलियाने हैदराबादमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघ अव्वल स्थानी राहिले आहेत. कसोटीमधील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय खेळाडूंसह कांगारूही आटोकाट प्रयत्नात असतील. टीम इंडियाने इंग्लंडबरोबरची मालिका गमावली होती. तर ऑस्ट्रेलियादेखील दक्षिण आफ्रिकेकडून मायदेशात पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ही कसोटी मालिका कशी होते, याबाबत उत्सुकता आहे.

First Published: Thursday, February 21, 2013 - 22:02
comments powered by Disqus