पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 25, 2013, 04:41 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.
सचिन सूर्यवंशी यांची भाषा अरेरावीची होती. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याल शोभणारी भाषा नव्हती, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. विधीमंडळात आमदार आणि पोलिसामध्ये घडलेल्या प्रकारासंबधी एक समिती स्थापन करण्यात येईल. आमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तोपर्यंत पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी केली.
आमदारांना निलंबित केल्यानंतर पीएसआय सूर्यवंशी यालाही निलंबित करावे, अशी मागणी आमदारांनी विधानसभेत केली होती. या दबावाला बळी पडत हे निलंबन करण्यात आल्याची चर्चा विधानसभा परिसरात होती.

सचिन सूर्यवंशींना अटक कधी?
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचं कामकाज सुरुवातीला तहकूब करावं लागलं होतं. हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात, असं कारण सांगत पोलिसांनी जामीनास विरोध केला होता. यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे.
तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृहमंत्रालयानं पोलिसांना दिले होते. हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जातोय. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.