हैदराबाद स्फोट : एमआयएमच्या पदाधिका-याची चौकशी

हैदराबादमधील स्फोटप्रकरणी नांदेडमधल्या एमआयएमच्या वरिष्ठ पदाधिका-यांची काल रात्री कसून चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसनं ही चौकशी केलीय. एटीएसनं आता एमआयएमवरही लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. कारण यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मराठवाडा कनेक्शन समोर आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2013, 09:42 AM IST

www.24taas.com, हैदराबाद
हैदराबादमधील स्फोटप्रकरणी नांदेडमधल्या एमआयएमच्या वरिष्ठ पदाधिका-यांची काल रात्री कसून चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसनं ही चौकशी केलीय. एटीएसनं आता एमआयएमवरही लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. कारण यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मराठवाडा कनेक्शन समोर आलंय.
हैदराबाद स्फोटांना दोन दिवस उलटून गेले असताना आंध्र प्रदेश सरकारनं अत्यंत महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं म्हटलंय. तपासासाठी १५ टीम्स तयार करण्यात आल्याचं आंध्रच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय. स्फोटांच्या मोडस ऑपरेंडीवरून संशयाची सुई इंडियन मुजाहिद्दीनकडेच जातेय आणि त्या दिशेनं तपास सुरू आहे.

अब्दुल वासी मिर्झा हा २३ वर्षांचा युवक शहरातल्या दोन स्फोटांत जखमी झालाय. त्याचीही पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, तपासासाठी महत्वाची माहिती देणा-यास बक्षीस हैदराबाद पोलिसांनी जाहीर केलंय.
दिलसुखनगर बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणचं `CCTV` फूटेज पोलिसांना मिळाले आहे. `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण? याची माहिती मिळत नाही. असे असले तरी या स्फोटाविषयी माहिती देणाऱ्याला दहा लाख रूपयांचं बक्षिस देण्याचे जाहीय करण्यात आले आहे. तशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली.