अजित पवार खोटारडे – सुभाष देसाई, Deputy Chief Minister Ajit Pawar

अजित पवार खोटारडे – सुभाष देसाई

अजित पवार खोटारडे – सुभाष देसाई
www.24taas.com, मुंबई

शेवटी जे वाटत होतं तेच त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेला फसवलंय. राजीनाम्याचे नाटक. काही दिवस बाहेर राहायचं. त्याच्यातील हवा काढायची, अशा उद्देशाने त्यांनी दिलेला राजीनामा. पुढे काय झालं. आपणच परीक्षेला बसायचे आणि त्यांनीच पेपर द्यायचे आणि रिझल्ट्ससाठी त्यांनीच पेपर तपासायाचा, अशा प्रकारची लुटूपुटूची लढाई दिसत आहे. असेच राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.

अजित पवार यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यावर देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी जनतेला फसवलंय. मुख्यमंत्री स्वच्छतेचे असतील तर त्यांना ते कसं चालते. त्यांनी काय तो सोक्षमोक्ष लावलेला नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

सिंचन घोटाळ्यांना जो जबाबदार आहे. त्यालाच क्लिनचीट दायचा आणि मागच्यादाराने त्याला आणण्याचा प्रयत्न करायचा हेच बरोबर नाही. सिंचनाच्या आरोपांची चौकशी झालेली नाही. थातूरमातूर पत्रिका काढली. त्याचाही सोक्षमोक्ष झालेला नाही. असे असताना अजित पवार यांना सत्तेत येण्याची खूप घाई झालेली आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे, असे सुभाष देसाई म्हणालेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे. सर्वात प्रथम `झी २४ तास`ने हे वृत्त दिलं होतं.

गेल्या पधंरा दिवसापूर्वीच अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात परतणार अशीही बातमी `झी २४ तास`नेच दिली होती. त्यामुळे अजितदादा मंत्रिमंडळात येण्याचे संकेत आज त्यांनी नवी मुंबईतच दिले होते. आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावंकर यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असताना स्वत: तटकरे यांनी आमच्या प्रतिनिधीनी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे सिंचनावरील श्वेतपत्रिका जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे सत्तेत परतणार हे आता जवळ निश्चितच झाले आहे. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

First Published: Thursday, December 06, 2012, 19:20


comments powered by Disqus