24taas.com- now national anthem before marathi plays

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत
www.24taas.com, पुणे

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हंटलं जातं. काही वर्षांपूर्वी चित्रपटगृहात सुरु झालेली ही प्रथा आता नाट्यगृहातही सुरू केली जाणार आहे. याची सुरुवात झाली ती प्रशांत दामलेंच्या "सासू माझी ढासू" या नाटकाच्या पुण्यातल्या प्रयोगापासून....यशवंतराव नाट्यगृहात स्वातंत्र्यदिनादिवशीच्या प्रयोगापासून राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात झाली. यावेळी गायिका आर्या आंबेकर आणि ऋतुज घाटे यांनी राष्ट्रगीताचं गायन केलं. नाट्यरसिकही त्यात सहभागी झाले.

राष्ट्रगीत हा राष्ट्रभक्तीचा मंत्र आहे. म्हणूनच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्याची परंपरा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुण्यात पडलेला हा पायंडा सगळे नाट्यकर्मी आणि नाट्यरसिक पुढेही जपतील, अशी अपेक्षा आहे.

First Published: Wednesday, August 15, 2012, 15:42


comments powered by Disqus