उल्कापिंडाचं रहस्य Secret of meteor

उल्कापिंडाचं रहस्य

उल्कापिंडाचं रहस्य
www.24taas.com, मुंबई

रशियातील चेल्याबिन्स्क परिसरात शुक्रवारी उल्कापात झाला...त्यामध्ये ९००जण जखमी झाले खरे...त्यामुळे या आस्मानी संकटाची सगळीकडंच चर्चा झाली...पण आता त्या उल्कापिंडाच्या तुकड्यांना मोठी किंमत आलीय...सोन्याहून चाळीपट जास्त भाव उल्कापिंडाच्या तुकड्यांना आलाय...

गेल्या शुक्रवारी मध्य रशियात आकाशात हे चित्र पहायला मिळालं...आकाशात एक तेजस्वी गोळा पृथ्वीच्या दिशेनं झेपावला...तो एक उल्कापात होता... पहाटेच्यावेळी उल्का पिंडाचे असंख्य तुकडे वेगाने जमिनीवर येवून आदळले...चेल्याबिन्स्क परिसरात उल्का पिंडाचे तुकडे येवून पडल्यामुळे नऊशेहून अधिक लोक जखमी झाले... या उल्कापातामुळे जबरदस्तस्फोट झाला ... घरांच्या काचा फुटल्या आणि त्या काचांमुळे नागरिक जखमी झाले...मात्र आता या उल्का पिंडाच्या तुकड्याला सोन्यापेक्षा जास्त भाव आलंय...

उल्कापिंडाचे तुकडे बहुमूल्य असून उल्कापिंडाच्या एका ग्रॅमला सव्वा लाख रुपये मोजले जात आहेत..रशियातील विज्ञान अकादमीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेबरकुल तलावात उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडले आहेत..या तुकड्यांमध्ये लोह, क्राईसोलाईट आणि सल्फाईटचा अशं सापडला आहे...खगोल संशोधनाच्या दृष्टीने उल्कापिंडांच्या तुकड्यांना मोठं महत्व आहे...

उल्कापिंडाच्या तुकड्यांना सोन्यापेक्षा ४० पट जास्त भाव आलाय..पण उल्कापिंडामुळे लोकांच्या मनात भीतीही निर्माण झाली होती...अशीच भीती धुमकेतूच्या बाबतीतही व्यक्त केली जातेय...पण आता या धूमकेतू विषयी बरचं संशोधन झालं असून त्यावर कुबेराचा खजिना दडला असल्याची माहिती समोर आलीय..
दर २० वर्षानंतर एक धुमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळ येतो...पण जेव्हा तो पृथ्वीच्या जवळून जातो तेव्हा तो एखाद्या तेजस्वी ता-याप्रमाणे भासतो... धुमकेतूच्या तेजामागच्या कारणाचा उलगडा करण्यात आता शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे...पृथ्वी प्रमाणेच धुमकेतूवर मोठ मोठे कडे आणि डोंगर आहेत..तसेच पृथ्वी प्रमाणेच धुमकेतूवरही खनिजाचा मोठा साठा असल्याची माहिती आता समोर आली आहे..

अंतराळात फिरणारे धुमकेतू हे माणसासाठी निसर्गाची देणगी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या धूमकेतुंवर नैसर्गिक खनिजांचा प्रचंड साठा असून भविष्यात माणसाला त्याचा उपयोग करुन घेता येणार आहे.

धूमकेतू अंतराळात फिरत असतांना त्यावरच्या लहान मोठ्या तुकड्यांची अनेक वेळा एकमेकांशी टक्कर होते आणि त्यातून निर्माण होणारं लहान लहान तुकडे त्या धुमकेतूसोबत फिरत असतात. पण ही केवळ कल्पना नसून ते वास्तव असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. धुमकेतूवर स्पेसक्राफ्ट पाठवून त्याविषयी संशोधन करण्यात आलं आहे..आणि त्याच माहितीच्या आधारे धुमकेतूवर खणण करण्याची तयारी सुरु करण्यात आलीय...

अंतराळात वेगाने फिरणा-या धुमकेतूवर खणन शक्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय..धुमकेतूवर खणन करण्यासाठी आवश्यक असलेल्या मशिन्स आज उपलब्ध असून त्या धुमकेतूवर पाठविल्या जाऊ शकतात ...तसेच तिथं तात्पुर्तं आश्रय केंद्र उभारता येणार आहे..कारण धुमकेतूवर पाणी उपलब्ध असल्याचा दावा संशोधकांनी केलाय..ही सगळी पार्श्वभूमी पहाता आजपर्य़ंत ज्या धुमकेतूंना धोकादायक मानलं जातं होतं तेच धुमकेतू माणसांसाठी वरदान ठरणार आहेत..

धुमकेतूमध्ये प्रचंड खनिजसाठा उपलब्ध आहे..पण चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतरही माणसासाठी चंद्र अद्यापही दूरच आहे..त्यामुळे प्रचंड वेगाने अंतराळात फिरणा-या धुमकेतूवर मानवाला पाऊल ठेवणं शक्य होणार आहे का ? असा प्रश्न आता विचारला जात आहे..

पृथ्वीच्या आजूबाजूला फिरणारे हे धुमकेतू ...पण या धूमकेतुवर आता संशोधकांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे..वैज्ञानिकांच्या मते २०१६मध्ये एक महाकाय धुमकेतू पृथ्वीपासून केवळ अडिच लाख किलोमिटर अंतरावरुन जाणार आहे...तो धुमकेतू चंद्रापेक्षीही अधिक जवळ असणार आहे आणि त्यामुळेच नासाने त्यावर खणन करण्यासाठी लक्ष्य केंद्रीत केलं आहे...त्यासाठी विशेष स्पेसक्राफ्ट तयार केलं जात असून त्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळवीर धुमकेतूवर पाठविण्यात येणार आहेत.

ते स्पेसक्राफ्ट अंतराळात झेपावल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात ते अंतराळात पोहोचेल..तो धुमकेतू पृथ्वी जवळ येईपर्यंत ते स्पेस क्राफ्ट अंतराळातच राहणार असून धुमकेतूची दिशा आणि वेग याचा अभ्यास केला जाणार..धुमकेतू कोणत्या वेळेला पृथ्वीच्या अगदी जवळ येणार हे या माध्यमातून निश्चित केलं जाणार आहे..जेव्हा तो धुमकेतू पृथ्वीच्या जवळ येईल तेव्हा ते स्पेसक्राफ्ट त्या धुमकेतू जवळ जाईल..

पण धुमकेतूवर पोहचण्यात एक मोठी समस्या आहे..आणि ती म्हणजे धुमकेतूसोबत गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने पुढे जाणारे त्याचे लाखो तुकडे...साधारणपणे धुमकेतूसोबत असंख्य लहानमोठे दगडाचे तुकडे फिरत असतात...ते धुमकेतूच्या चोहोबाजूला पसरलेले असतात..विशेष म्हणजे ते धुमकेतूपासून ना दूर असतात ना धुमकेतूच्या पृष्टभागाला चिकटतात...ऑपरेशन एस्ट्रॉईडअंतर्गत एक विशेष प्रकारचं स्पेसक्राफ्ट तयार केल ंजात असून त्यामध्ये एकापेक्षा अधिक इंजिनची सुविधा असणार आहे तसेच अनेक चेंबरही उभारण्यात येणार आहे..त्यामुळे त्या स्पेसक्राफ्टमधील अंतराळवीर सुरक्षित राहू शकतील..तसेच ते सुरक्षितपणे पृथ्वीवर परतही येवू शकतील..

स्पेसक्राफ्ट धुमकेतूवर उतरल्यानंतर ख-या अर्थाने मानवाच्या इतिहासातील अंतराळ अभियानाला सुरुवात होणार आहे..आणि ते म्हणजे एस्टॉईड मायनिंग..

धुमकेतूवर खणन करण्यासाठी मशिन्स तयार करण्यात आल्या आहेत..त्या मशिन्स स्वयंचलीत असल्या तरी त्यावर अंतराळवीरांचं नियंत्रण असणार आहे..स्पेसक्राफ्टमधे असलेले अंतराळवीर तिथल्या परिस्थितीनुसार त्या ड्रिलिंग मशिनचा वापर करुन धुमकेतूवर खणन करु शकणार आहेत..


तीन दिवस खणन केल्यानंतर ते खनिज पदार्थ अंतराळवीर आपल्या स्पेसक्राफ्टमध्ये जमा करतील आणि त्या स्पेसक्राफ्टच्या माद्यमातून ते पुन्हा पृथ्वीवर उतरतील..

तज्ञांच्या मते धुमकेतू ते पृथ्वी हे अंतर फार मोठं असणार आहे..कारण ताशी कित्येक लाख मैल वेगाने धुमकेतू अंतराळात फिरत असतो..

First Published: Wednesday, February 20, 2013, 23:54


comments powered by Disqus