Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मृत्यूचं तूफान...

Monday, October 29, 2012, 21:15
Comments 2
 
मृत्यूचं तूफान...www.24taas.com, न्यूयॉर्क

जागतीक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेचं धाबं दणाणलेत...सगळ्या जगाला धाकात ठेवणारी अमेरिका घाबरलीय ती सँडी नावाच्या वादळाला...हे आस्मीनी संकट अमेरिकेच्या पूर्व भागात येवून थडकलं असून त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय जातेय..सँडी हे गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरण्याची शक्यता आहे.११०० किमीपेक्षा जास्त परिसरातला याचा तडाखा बसणार आहे...एव्हड्या मोठ्या संकटाचा अमेरिका कसा सामना करणार हा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. काय आहे हे मृत्यूचं तूफान...

सँडी वादळ अमेरिकेच्या किनारपट्टीवर येवून थडकलं आहे..त्यामुळे अमेरिकेतल्या नागरिकांची अक्षरश: झोप उडालीय...सँडीला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं वादळ का म्हटलं गेलंय. ढगांनी चोहोबाजूंनी वेढलेली पृथ्वी... अंतराळातून दिसणारं हे पृथ्वीचं रुप पाहून अवघ जग हादरुन गेलंय...जगतीक महासत्ता समजल्या जाणा-या अमेरिकेवरच हे महासंकट ओढावलंय.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि मिट रोमनी यांनी व्हर्जिनियाचा प्रचार दौरा रद्द केला आहे..कोलराडोमध्ये सोमवारचा प्रचार दौरा त्यांनी रद्द केलाय. अमेरिकेत गेल्या सात दशकात आलेलेल्या वादळांपैकी हे वादळ सर्वात भयंकर आहे.मृत्यूचं तूफान...

खरं तरं अमेरिकेत सुरू होती राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीची धामधूम... ओबामा की रोम्नी या प्रश्नाच उत्तर काहीच दिवसात मिळणार होतं... मात्र अचानक एक नैसर्गिक संकट अमेरिकेवर ऊभ ठाकलयं... आत्तापर्यंत शंभराहून अधिक जणांचे बळी घेणारं सँण्डी वादळ अमेरिकेवर घोंगावतयं... त्यामुळे अमेरिकेतल्या न्यूयॉर्कसह अनेक मोठ्या शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.

कॅरेबियन आयलँड आणि हैतीमध्ये सँडी वादळाने मृत्यूचं तांडव घातलं असून तिथली परिस्थिती पाहून सगळ्यांची धास्ती वाढली होती...पण पुढे हे वादळ असं काही अकराविकराळ रुप घेईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.सँडी वादळचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार नाही असं सुरुवातील वाटलं होतं..तसेच ते लवकरच शांत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता..पण आता या वादळाने जे रुप धारण केलंय ते पहाता जगातील सर्वात भय़ंकर वादळ ठरण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या ज्या भागाला या वादळाचा फटका बसणार आहे त्या परिसरात लोकसंख्या अधिक आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार वेगवान वारा आणि महाकाय आकाराच्या या वादळाचा फटका बोस्टन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलेडेल्फिया या शहरांना बसणार आहे. हवामान खात्याकडून सतत माहिती दिली जात असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..या कारणामुळेच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं वादळ म्हटलं जातं आहे. या वादळाची ही दृष्य पोटात गोळा आणणारी आहेत. मृत्यूचं तूफान...
जिथं -जिथं सँडीने पाऊल टाकलंय तिथ-तिथ मोठ्या प्रमाणात मणुष्यहानी तसेच मालमत्तेचं नुकसान झालंय..आता हेच विनाशकारी वादळ अमेरिकेसाठी धोकादायक बनलंय....हवामान खातं आणि अमेरिकेचं गृहसंरक्षण दलाला या धोक्याची पुरेपूर कल्पना आहे..मात्र अमेरिकेत जो सर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय..या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला जात आहे..

अमेरिकेत धोक्याचा इशारा दिला गेलाय. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा घरात साठा करुन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे..वादळा दरम्यान हवेचा वेग लक्षात घेता लोकांना स्थलांतरीत केलं गेलंय..एकट्या न्यूयॉर्क शहरातून ३७ हजार नागरिकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आलं आहे..पण पुढच्या काळात वादळाचा वेग आणखीनच वाढल्यास त्यामुळे अमेरिकेचा धोका वाढण्याची शक्यता वर्तली जातेय... अंतराळातून या वादळावर लक्ष्य ठेवून असलेल्या तज्ज्ञांच्या मते सँडी जेट स्ट्रीमला धडकल्यास त्याच आकार आणि वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर ही टक्कर झाल्यास विनाश अटळ आहे.

न्यूयॉर्कमध्ये रेल्वे,बस, सब-वे राहणार बंद राहणार आहेत. अमेरिकेच्या नौदलाने यूएसएस हॅरी समवेत आपल्या सर्व युद्ध नौका सँडी वदळापासून शेकडो मैल लांब नेवून उभ्या केल्या आहेत..याच कारणामुळे ग्वाँटेमालच्या समुद्र परिसरात राहणा-या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलंय..सँडीने न्यूयॉर्कच्या ६१५ किमी दक्षिण पूर्व भागाला उध्वस्त केलं आहे..

सँडी वादळाची सुरुवात २२ ऑक्टोबरला झाली.. पश्चिम कॅरेबियन सागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला ..त्यामुळं चोहोबाजून तिथ हवा ओढली जाऊ लागली..आणि पहाता पहाता गरम तसेच थंड हवेच्या मिश्रणातून हे महाकाय वादळ जन्माला आलं. कॅरेबियन समुद्रातून या वादळाला सुरुवात झाली आणि ते जमैकाच्या दिशेनं सरकलं..त्यावेळी हवेचा वेग ताशी १५९ किमी होता.

२४ऑक्टोबरला जमैकामध्ये या वादळाने अक्षश: तांडव केलं..त्यानंतर दुस-याच दिवशी सँडीने क्युबामध्ये धुमाकूळ घातला..२६ ऑक्टोबरला या वादळाने ६९ जणांचा जीव घेतला होता..पण तीन दिवसांनंतरही त्याचा ना वेग कमी झाला ना त्यामुळे होणारं नुकसान कमी झालं..बहामाससह अनेक परिसरात या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे..२७ ऑक्टोबरला सँडी सर्वात भयंकर वादळाचा दर्जा देण्यात आला..२८ ऑक्टोबरला दक्षीण कॅरोलिनाला सँडी पोहोचलं तेव्हा त्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला होता..मात्र तज्ज्ञांच्या मते हे वादळ जेट स्ट्रीममध्ये मिसळण्याची शक्यता आहे..जर असं झाल्यास सँडीचा वेग ताशी ५०० किमीपेश्रा जास्त होण्याची शक्यता आहे..तसचं झाल्यास चोहीकडं केवळ विनाशच पाहायला मिळेल.मृत्यूचं तूफान...
सँणडीच्या आधी अमेरिकेनं नैसर्गिक संकटांचा सामना केलाय... २००५ मध्ये आलेल्या कॅटरीना वादळानं शेकडो नागरिकांचा बळी घेतलाय तर कोट्यवधींच नुकसान केलं होतं. २३ ऑगस्टला बहामासच्या जवळ झाली होती...आणि अवघ्या काही दिवसातच त्याने फ्लोरिडा,क्युबा,लुईसियाना, मिस्सीपीसी पॅनहेंडर आणि अमेरिकेच्यापूर्वेकडील परिसराला जबर तडाखा दिला होता..मिसीपिसीला सर्वाधिक फटका सहन करावा लागला होता.... अनेक ठिकाणी समुद्राचं पाणी २० किमीपर्यंत किना-या लगतच्या परिसरात शिरलं होतं..कॅटरीना वादळाने मिसीपिसीत २३८जणांचा जीव घेतला होता..अल्बामा, फ्लोरिडा, जॉर्जिया आणि अमेरिकेच्या अन्य परिसरात एकून १८३६ लोकांचा बळी गेला होता..अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं वादळ म्हणून कॅटरीनाची गणना केली गेली..या वादळामुळे ५४०० अब्ज रुपयांच नुकसान झालं होतं.

आता सात वर्षानंतर पुन्हा एकदा निसर्ग त्याची पूनरार्वृत्ती करण्याच्या तयारीत तर नाही ना ? असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे..कारण ज्या पद्धतीने सँडी वादळाने अकराळविकराळ रुप धारण केलंय ते पहाता कोणताच अंदाज बांधणं अशक्य असल्याचं तज्ज्ञाचं म्हणनं आहे..त्यामुळे धोक्याची शक्यता आणि परीघ वाढत चालला आहे..पुढच्या काळात परिस्थिती अशीच राहिल्यास वादळापासून संरक्षण करणं अशक्य होईल.

ताशी१२० किमीच्या वेगाने हे वादळ अमेरिकेच्या पूर्वेकडील परिसरात येवून थडकलंय....सँडीचा सर्वाधिक फटका बोस्टन,न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंगटन, बाल्टीमोर आणि फिलाडेल्फिया या शहरांना बसणार आहे...या शहरात कोट्यवधीची लोकसंख्या असून त्यांना याचा सामना करावा लगाणार आहे..सँडी वादळामुळे मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचं मतं वादळ अभ्यासकांनी व्यक्त केलंय. सँडीमुळे निर्माण होणा-या परिस्थितीचं अकलन करण्याचा प्रयत्न केला जात असून वीज,पाणी, विमान, रेल्वे सेवा खंडीत होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय...सँडीने आता पर्यंत १००हून अधिकजणांचा बळी घेतला असून अमेरिकेत काय होणार याकडं सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय.

First Published: Monday, October 29, 2012, 21:01

प्रतिक्रिया

Milind Sapre - New York
it is unfortunate to see inaccurate and irresponsible news reporting from a major channel like zee.
प्रतिक्रिया द्या

Milind Sapre - New York
it is unfortunate to see inaccurate and irresponsible news reporting from a major channel like zee.
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: