काँग्रेसचं `वेट अँड वॉच`

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, September 26, 2012 - 15:07

www.24taas.com, मुंबई
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना राजीनामाप्रकरणी मौन बाळगण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारही अडचणीत आलं आहे. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी नेत्यांना मनाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे.
याचबरोबर, ‘अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या’ अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.
मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितलं, की आजची बैठक ही राजकीय कारणास्तव होत नसून केवळ दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी घेण्यात येत आहे. शरद पवार मुंबईत दाखल झाल्याशिवाय या संदर्भात कुठलीही चर्चा होणार नाही, असंही पिचड म्हणाले

First Published: Wednesday, September 26, 2012 - 15:00
comments powered by Disqus