`दादा थांबा.. मुख्यमंत्री व्हाल` मनसेचा टोला

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, December 6, 2012 - 21:33

www.24taas.com, मुंबई
मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी अजित दादांच्या कमबॅकवर चांगलेच टोमणे मारले आहेत. अजित पवार पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेणार असल्याबद्दल बाळा नांदगावकरांनी प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकरांनी अजित दादांची चांगलीच खिल्ली उडवली.
दादा मंत्रिमंडळापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही हेच या घटनेतून दिसून आल्याचं नांदगावकर म्हणाले. या वेळी नांदगावकरांनी मिर्झा गालिब यांचा एक शेरही ऐकवला.
जिस घर को छोड आये थे, घबराके हम कभी, दुनिया के ठोकरोने वही घर दिखाया.. अशीच काहीशी अजितदादांची अवस्था झाली आहे.असं नांदगावकर म्हणाले.
तसंच, दादा घाई करू नका. थोडं थांबा. तुम्ही परत याल मंत्री बनून.. अगदी मुख्यमंत्रीही बनाल अशी खिल्लीही नांदगावकरांनी उडवली. दादांना मुळात राजीनामा द्यायला कुणी सांगितलं होतं? विरोधक आरोप करतच असतात. त्यावर लगेच राजीनामा देण्याची गरज नव्हती. असंही नांदगावकर म्हणाले.

First Published: Thursday, December 6, 2012 - 21:33
comments powered by Disqus