अजितदादा `पॉवरफुल`च राहणार!

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, December 7, 2012 - 09:13

www.24taas.com, मुंबई
अजितदादा ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे आता स्पष्ट झालंय. मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर दादा पुन्हा एकदा पॉवरफुल खात्यांची सूत्रं सांभाळणार आहेत.
अजितदादांचा मंत्रिमंडळात समावेश होत असताना अजितदादा पूर्वीसारखेच पॉवरफुल्ल राहणार आहेत. अजितदादांकडे अर्थ आणि ऊर्जा ही दोन्ही खाती पुन्हा येणार आहेत. सध्या ही खाती जयंत पाटील आणि राजेश टोपे यांच्याकडे होती. मात्र, दादा ही खाती पुन्हा स्वतःकडे घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. `झी २४ तास`कडे ही खात्रीलायक बातमी आहे.
गेल्या पधंरा दिवसापूर्वीच अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात परतणार अशीही बातमी `झी २४ तास`नेच दिली होती. त्यामुळे अजितदादा मंत्रिमंडळात येण्याचे संकेत आज त्यांनी नवी मुंबईतच दिले होते.

First Published: Friday, December 7, 2012 - 09:10
comments powered by Disqus