शरद पवार मुंबईत, जोर-बैठका सुरू

राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 28, 2012, 04:41 PM IST

www.24taas.com, मुंबई
राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता. सुमारे दोन तास शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यानंतर यशवंतराव सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली, आता सध्या विधीमंडळात सर्व आमदारांसह शरद पवार बैठक घेत असून त्यांनंतर या राजीनाम्या नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे १ तास ५० मिनिटे बैठक घेतली. तसेच ज्येष्ठ नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या दोन्ही बैठकीनंतर आता विधीमंडळात शरद पवारांच्या उपस्थितीत अजून एक बैठक सुरू असून त्यात शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
या बैठकीत अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारणाचा निर्णय होऊ शकतो. तसे शरद पवार जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.