अपक्ष आमदारांचा सरकारला इशारा

अपक्ष आमदार वेगळ्या पवित्र्यात आहेत. अजित पवार असतील तरच राज्य सरकारला पाठिंबा देऊ असा आक्रमक पवित्रा अपक्ष आमदारांनी घेतलाय. अन्यथा सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करु असा इशारा अपक्ष आमदारांनी दिलाय.

www.24taas.com,पुणे

राज्यातील आघाडी सरकाराला पाठिंबा देण्याबाबत इशारा देताना हे संकेत अपक्ष आमदार दिलीप सोपल यांनी दिलेत. १२ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. या अपक्ष आमदारांचं नेतृत्व दिलीप सोपल यांच्याकडं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शरद पवार आजही कोलकात्यात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. कोलकात्यातून ते महाराष्ट्रातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहेत.