राजकारण काका-पुतण्यांचं!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, September 27, 2012 - 23:49

www.24taas.com, मुंबई
पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं...

२५ सप्टेंबर २०१२... हा दिवस मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारणी कधीच विसरु शकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड असलेल्या काका-पुतण्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष तर सुरु झाला नाही ना? अशा शंका राजकीय जाणकारांच्या मनात आली होता. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्री पदाचा अचानकपणे राजीनामा दिला होता.
१९ मार्च २००६... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय मैदानात उतरले होते. पण, यावेळी त्यांनी थेट काकांनाच आव्हान दिलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकल्यास राज्याचं राजकारण या दोन दिग्गज काका-पुतण्यांच्या भोवताली फिरत असल्याचं लक्षात येईल. काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आणि पुढे राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण शरद पवारांपेक्षा अजित पवारांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. शरद पवार हे मवाळ आणि मुरब्बी राजकारणी आहेत तर अजित पवार हे सडेतोड भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेही आक्रमक असून राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर आपलं राजकीय नेतृत्व सिद्ध केलं आहे.

पवार आणि ठाकरे...
अजित पवार आणि राज ठाकरे यां दोघांचा सुरुवातीचा राजकीय प्रवास जवळपास सारखाच आहे. दोघांनाही आपल्या काकांकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं पण पुढे राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला तर अजित पवार अद्यापही आपल्या काकांसोबत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या दोन नेत्यांचा राजकीय प्रवास कसा झाला, टाकुयात एक नजर... बारामती मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडत दिल्लीच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा तो काळा होता जेव्हा शरद
पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची पकड कमजोर होणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. पण त्यावरही पवारांनी उपाय शोधून ठेवला होता. ज्या पद्धतीने शरद पवार राजकारणाची एक एक पायरी वर चढत गेले होते त्याच मार्गाने त्यांचे पुतणे अजित पवारही महाराष्ट्राच्या राजकारणात मार्गक्रमाण करत होते. शरद पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड मजबूत केली. त्याच पद्धतीने त्यांचे पुतणे अजित पवारांनीही काकांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश केला. पुढे अजित पवारांनी सुरेश कलमाडींना धक्का देत पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवली. या माध्यमातून त्यांनी पुणे शहराच्या राजकारणावर पकड मिळवली होती. शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवारांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. पुढे शरद पवारांसाठी तो मतदारसंघ त्यांनी सोडला. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या नावाला मोठं महत्त्व आहे. त्यांच्या एका राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात जणू वादळ आलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाप्रमाणेच ठाकरे कुटुंबालाही मोठं महत्त्व आहे. अजित पवारांप्रमाणेच राज ठाकरेंनाही आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू घेतलंय. त्यामुळेच त्यांच्या भाषण शैलीपासून ते रोखठोक स्वभावापर्यंत सगळ्यात बाळासाहेबांचं प्रतिबिंब त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसतं. काकांप्रमाणेच राज ठाकरेही व्यंगचित्रकार असले तरी त्यांचा पिंड राजकारणाचा आहे. १९९०च्या दशकात राज ठाकरेंनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांना शिवसेनेकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पुढे १९९७ मध्ये त्यांनी शिव उद्योग सेनेची स्थापना केली. राज ठाकरे आणि अजित पवार यांची राजकीय कारकीर्द बघितल्यास दोघांच अंतिम ध्येय एकच असल्

First Published: Thursday, September 27, 2012 - 23:45
comments powered by Disqus