'इंद्रधनु' रंगे इंटरनेट संगे

ठाण्याच्या ‘इंद्रधनु’ सांस्कृतिक कार्यक्रम रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. गेल्या पंचवीस वर्षात इंद्रधनुच्या व्यासपीठावर ३०० एकाहून एक सरस दर्जेदार कार्यक्रमांनी ठाणेकरांचे साहित्यक, कला आणि संगीत जीवन समृध्द केलं. आता ‘इंद्रधनु’च्या संस्मरणीय मैफली जगभरातील रसिकांसाठी यु ट्यूबवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Updated: Nov 23, 2011, 02:08 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

ठाण्याच्या ‘इंद्रधनु’ सांस्कृतिक कार्यक्रम रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. गेल्या पंचवीस वर्षात इंद्रधनुच्या व्यासपीठावर ३०० एकाहून एक सरस दर्जेदार कार्यक्रमांनी ठाणेकरांचे साहित्यक, कला आणि संगीत जीवन समृध्द केलं. आता ‘इंद्रधनु’च्या संस्मरणीय मैफली जगभरातील रसिकांसाठी यु ट्यूबवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

त्यामुळेच १९८९ साली श्रीधर फडकेंनी सादर केलेला फिटे अंधाराजे जाळे सारखा कार्यक्रम असो की १९९२ साली यशवंत देवांनी बा.भ.बोरकरांच्या कवितांचे सादरीकरणाचा आस्वाद जगाच्या कोणत्याही काना कोपऱ्यात घेता येणार आहे. ज्येष्ठ गायिक सूमन कल्याणपूर, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर यासारख्या एक हजाराहून अधिक कलाकारांनी इंद्रधनुच्या महोत्सवात उपस्थिती लावली आहे.  आता तो ठेवा यु ट्यूबमुळे सर्वांना उपलब्ध होणार आहे. indradhanuthane.org  या संकेतस्थळावर तसेच यु ट्यूबवर  ‘इंद्रधनु’च्या अनेक कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इंद्रधनुच्या उपक्रमांमुळेच महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी अशी ठाण्याची ओळख होण्यास मोलाचा हातभार लावला आहे.