'ती' कविता मना-मनातली....

"आम्ही वाचतो पानातली, तुम्ही ऎकता ओठातली असते खरंच असते ती कविता मना-मनातली...."

Updated: Jul 12, 2012, 12:40 PM IST

www.24taas.com, पनवेल

 

"आम्ही वाचतो पानातली, तुम्ही ऎकता ओठातली
असते खरंच असते ती कविता मना-मनातली...." 

 

कविता तुमच्या आमच्या मनातील... कविता म्हणजेच जगण्याची खरी उमेद असते... आणि उतारवयात या कविताच आपल्या सोबती असतात.. आपण प्रत्येकजण एक प्रकारचे कवी असतो... उतारवयात आपल्याला खरी गरज असते कुणाच्या तरी आधाराची. आणि अशा वेळी अशातच जर का याच वयोवृद्धांना आयुष्याचा संध्याकाळी छानशा कवितांच्या कार्यक्रमचा आस्वाद मिळाला तर.....

 

१० जुलै रोजी जेष्ठ नागरिक संघ, बांगुरनगर गोरेगाव (प) येथे खास " कविता मना-मनातलीचा " प्रयोग आयोजित करण्यात आला होता. प्रिझम आर्ट्स संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तेथील ज्येष्ठ नागरिकांची संध्याकाळ खरंच अविस्मरणीय ठरली. कविता मना-मनातली " या संकल्पनेला फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्रिझम आर्ट्स संस्था असेच काही सामाजिक उपक्रम करीत असते.

 

कविता मना - मनातली " याचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत. प्रिझम आर्टस संस्थेमध्ये तरूणांनी खास एकत्र येऊन कवितेसाठी कार्यक्रम करण्याचे ठरविले. आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. मनोरंजनातून प्रबोधन या तत्वावर प्रिझम आर्टस संस्थेने असे कवितांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आपणांसही ह्या कवितांचा आस्वाद घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा.

 

कार्यक्रमासाठी संपर्क :-

* गीतेश शिंदे - ९८२०२७२६४६

* मनीष तपासे- ९८२०८९१००५