लिंबू टिंबू.. नवी संगीत मेजवानी

आता बच्चेकंपनीसाठी खूषखबर... आणि ही खुशखबर म्हणजे लवकरच छोट्या दोस्तमंडळींसाठी त्यांचे लिटील चॅम्प मित्र नवा अल्बम घेऊन येत आहेत. लिंबू टिंबू हे या नव्या अल्बमचं नाव आहे.

Updated: Dec 21, 2011, 03:07 AM IST

झी २४ तास वेब टीम

आता बच्चेकंपनीसाठी खूषखबर... आणि ही खुशखबर म्हणजे लवकरच छोट्या दोस्तमंडळींसाठी त्यांचे लिटील चॅम्प मित्र नवा अल्बम घेऊन येत आहेत. लिंबू टिंबू हे या नव्या अल्बमचं नाव आहे.

बच्चेकंपनीचा नवा अल्बम लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. आणि त्यांच्या नव्या अल्बमचं नाव आहे लिंबू टिंबू. सगळ्या बच्चे कंपनीला आवडेल असाच हा अल्बम आहे. सारेगमप लिटील चॅम्प्स फेम पद्मानाभ गायकवाड, शरयू दाते आणि अदिती अमोणकर या तिघांनी मिळून या अल्बममधलं हे बालगीत गायलं आहे. या अल्बममध्ये या तिघांची सोलो गाणीही आहेत. या अल्बममधलं टायटल साँग गायलं आहे अदिती अमोणकरने.

लिंबू टिंबू या अल्बममध्ये वेगवेगळ्या प्रकारची तब्बल पंचवीस गाणी आहेत... या गीतांना वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलं आहे. या अल्बमसाठी म्युझिक अर्जेंटमेंट केली आहे कमलेश भडकमकर यांनी. तर मग या बच्चेकंपनीचा हा अल्बम छोट्यामंडळींबरोबच मोठेही नक्कीच एन्जॉय करतील असं म्हणायला हरकत नाही.

[jwplayer mediaid="16222"]