वाशी येथे संगीत रजनी कार्यक्रम

Last Updated: Thursday, June 28, 2012 - 17:33

www.24taa.com, नवी मुंबई

 

म्युझिक लिबरेशन युनियन संस्था. गेली नऊ वर्ष  संगीताचा ध्यास घेऊन अभ्यास करताना संगीताचा प्रसार करीत आहे. या संस्थेच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्ताने नवी मुंबईत वाशीमधील मराठी साहित्य मंदिर येथे संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम  दि.३० जून रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत होणार आहे.

 

'म्युझिक लिबरेशन' वास्तूशास्त्राचा अभ्यास करते. याबरोबरच संगीताची रूची निर्माण होण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यासाठी या संस्थेचे विद्यार्थी प्रयत्न करीत आहे. वास्तू  आणि संगीत रचना यांच्यात अनुबंध जुळवण्याचा हा कार्यक्रम २००७ पासून सुरू आहे. संगीताचा वेध असणार्‍या वासतुशास्त्राच्या  संगिताच्या सर्व शैलीच्या सादरीकरणाची संगीत शौकिनांना ही एक अपूर्व संधी आहे. जपानी तत्ववांवर आधारित कार्यक्रम आहे.

 

वास्तूशास्त्राचे विद्यार्थी असताना सुंदर आखीवरेखीव रचना रेखाटाणारे त्यांचे हात तितक्याच दमदार संगीत रचनांचे सादरीकरण करतात हे रसिकांना गेली नऊ वर्षे मोहून टाकत आहेत. भारतीया शास्त्रीया संगीतपासून ते पश्चात्या शैलातील संगीत रचनांची मेजवानीचा आस्वाद  वाशीतील कार्यक्रमात घेता येणार आहे.

First Published: Thursday, June 28, 2012 - 17:33
comments powered by Disqus