स्वप्न 'सिद्धार्थ नि सौमिल'चे

Last Updated: Wednesday, November 23, 2011 - 06:04

झी २४ तास वेब टीम, मुंबई


गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा मुलगा सिद्धार्थ महादेवन 'स्वप्न तुझे नि माझे' या मराठी सिनेमाद्वारे संगीतकार म्हणून आपल्यासमोर येतोय. त्याच्या या सिनेमाचा शानदार म्युझिक लाँन्च सोहळा नुकताच पार पडला. 'सिद्धार्थ-सौमिल' या  द्वयीने या सिनेमाला संगीत दिलंय.

 

नवोदित संगीतकार म्हणून 'सिद्धार्थ सौमिल' नावारुपास येतायत. त्यांनी संगीतबद्ध केलेला 'स्वप्न तुझे नि माझे' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्याच निमित्ताने या सिनेमाचा शानदार म्युझिक लाँन्च सोहळा नुकताच पार पडला. सचिन पिळगांवकरच्या हस्ते या सिनेमाचं म्युझिक लाँन्च झालं.  या म्युझिक लाँन्चला शंकर,एहसान,लॉय, सुबोध भावे, अशोक पत्की, अवधुत गुप्ते आवर्जून हजर होते. शंकर महादेवन यांचा मुलगा  सिद्धार्थ महादेवन आणि पुतण्या मित्र सौमिलचं या सिनेमाद्वारे संगीतकार होण्याचं स्वप्न पुर्ण होतंय.

 

'स्वप्न तुझे नि माझे' या सिनेमात एकुण पाच गाणी असून शंकर महादेवन, श्रेया घोषाल, राहुल वैद्य, आणि सिद्धार्थने सिनेमातली गाणी गायली आहेत. या म्युझिक लाँन्चला सिद्धार्थ, श्रेया घोषाल आणि शंकर महादेवनचा लाईव्ह परफॉर्मन्सही पहायला मिळाला. मुलाचं स्वप्न पूर्ण होतं असल्याचा आनंद शंकर महादेवन यांनी यावेळी व्यक्त केला. ओंकार कर्वे, नेहा जोशी, नितीन पोरगांवकर यांच्या या सिनेमात महत्त्वपुर्ण भूमिका आहेत. सिद्धार्थ सौमिलच्या या पहिल्या प्रयत्नाला प्रेक्षक कसा रिस्पॉन्स देतात हे पुढच्या महिन्यात सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.

First Published: Wednesday, November 23, 2011 - 06:04
comments powered by Disqus