`आतिफ-सारा` विवाहबंधनात

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमनं बॉलिवूडवर आपली जादू उधळलीय. हाच आतिफ आज लग्नाच्या बेडीत अडकतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 28, 2013, 03:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमनं बॉलिवूडवर आपली जादू उधळलीय. हाच आतिफ आज लग्नाच्या बेडीत अडकतोय. सारा भरवाना हिच्यासोबत आतिफचा निकाह सोहळा पार पडतोय. आतिफ नुकताच सुरक्षेत्र या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता.

बुधवारी, लाहोरमध्ये साराच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. आतिफच्या लग्नात त्याच्या कुटुंबियांसहीत संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. आतिफ आणि सारा एकमेकांना गेली वर्षांपासून ओळखत आहेत. लग्नानंतर २९ मार्च रोजी ‘दावत – ए – वालिमा’चा (रिसेप्शन) कार्यक्रम लाहोच्या रॉयल पाम क्लबमध्ये आयोजित केला जाणार आहे.

तुम्ही हो, तू जाने ना, पहली नजर में कैसा जादू कर दिया अशी अनेक हिट गाण्यांना आतिफनं आपल्या आवाजानं चार चाँद लावलेत.