शकिराला 'मुलगा' होणार!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, October 4, 2012 - 14:51

www.24taas.com, लंडन
‘वाका... वाका’ म्हणत अनेकांना आपल्या गाण्यावर ताल धरायला लावणारी शकिरा आता एक गोड बातमी देणार आहे. ती एका ‘मुलाची’ आई बनणार आहे. त्यामुळे ती सध्या खूप खूश आहे.
२५ वर्षीय स्पॅनिश फूटबॉलपटू जेरॉर्ड पिक आणि आपल्या संबंधांविषयी शकिरानं मार्च २०११ मध्ये कबुली दिली होती. या दोघांचं हे पहिलंच अपत्य असणार आहे. याआधी एका मुलाखतीत शकिरानं आपण आई बनण्यास तयार असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शकिरानं आपण गरोदर असल्याविषयीची बातमीही तिच्या फॅन्सशी शेअर केली होती. पण, आता तिला आपल्या बाळाचं लिंगही माहित पडलंय. आपल्याला ‘मुलगा’ होणार असल्याचं शकिरानं सांगितलंय.
शकिरा म्हणते, ‘मला मुलगा होणार आहे. जेरॉर्ड हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर भाग आहे.’ आपल्या अपत्याला आपल्यासोबत सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याची शकिराची इच्छा आहे.First Published: Thursday, October 4, 2012 - 14:35


comments powered by Disqus