बीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार

बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 12, 2014, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीड
बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.
रस्त्याच्या बाजुला उभा केलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील तवेरा कार धडकली. टायर पंक्‍चर झाल्याने कारवरील ताबा सुटला. या भीषण अपघातात 6 जण जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अन्य दोघे जखमी आहेत.
अपघातग्रस्त अंबाजोगाईवरून पहाटे बीडमार्गे औरंगाबादकडे तवेरा कारने निघाले होते. तवेरा गाडी नामलगाव (ता. बीड) जवळ आली असता तेथे टायर पंक्‍चर झाल्याने रस्त्याच्या बाजुला उभा केलेल्या ट्रकवर धडकली.
अपघातात ठार झालेल्यांची नावे - सय्यद सनाज सय्यद सलीम (42), सय्यल सलीम सय्यद अब्बास, (54), सय्यद सुलताना सय्यद करीम (32), सय्यद करीम सय्यद अली (37), सय्यद मजहर सय्यद जानउल्लाह (48), सय्यद अलीशा सय्यद कलीम (8), सय्यद जुबीया सय्यद मुजीब (2, सर्व रा. रविवारपेठ अंबाजोगाई), शेख जेबीया शेख अजहरूद्दीन (37 रा. सोमवती ता. लातूर) . याशिवाय अपघातात सय्यद सादेक सय्यद सलीम (25) आणि शेख अजहरूद्दीन शेख सत्तार (27) हे दोघे जखमी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.