धुळे, अहमदनगर महापालिकेचं चित्र स्पष्ट...

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 16, 2013 - 14:50

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.

दुपारी २:३० वाजता
धुळे महानगरपालिका - एकूण जागा – ७०
धुळ्यातील परिस्थितीही आता सर्वांच्या समोर आलीय. इथं अपक्षांचं पारडंही भारी ठरलंय.
अंतीम निकाल
राष्ट्रवादी - ३४
शिवसेना – ११
काँग्रेस – ७
भाजप – ३
बसपा - १
सपा - ३
लोकसंग्राम -१
इतर - १०

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज झालेल्या मतमोजणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांच्या हाती आल्या आहेत
अंतीम निकाल
एकूण जागा - ६८
आघाडी – २९
युती – २६
मनसे – ५
अपक्ष – ८

धुळे महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पूर्ण झाली. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांतेतेत पार पडली. यावेळी ६१.४९ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. सकाळी मतदारांचा प्रतिसाद प्रचंड होता. दुपारनंतर मात्र मतदारांमध्ये उदासीनता दिसून आली. तर नगरमध्ये ७३ टक्के मतदान झालं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013 - 09:03
comments powered by Disqus