उमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, April 1, 2014 - 10:21

www.24taas.com, झी मीडिया, लातूर/उमरगा
लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर या अपघातात अतिरिक्त जिल्हाधिकारी अझीज तांबेळी त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उमरगा इथं उपचार सुरू आहेत. गोंधपूरे आणि तांबोळी कुटुंबीय गुलबर्ग्याला देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी स्कार्पियोचं टायर फुटल्यानं, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
अझीज तांबोळी सोमवारी सकाळी पत्नी यास्मीन आणि मुलगा मन्सूर यांच्यासोबत देव देवदर्शानासाठी निघाले होते. त्यांच्या गाडीत त्यांनी विश्वास गोंधपूरे यांना सोबत घेतले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास गाडी उमरग्याजवळ पोहोचली होती. त्याचवेळी गाडीचा टायर अचानक फुटला आणि गाडी उलटली. या अपघातात गाडीच्या चालकासोबत विश्वास गोंधपूरे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Tuesday, April 1, 2014 - 10:21


comments powered by Disqus