नांदेड अपघातात ७ ठार, ४० जखमी

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, March 31, 2013 - 13:29

www.24taas.com,नांदेड

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झळकवाडीजवळ आज सकाळी ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात सात जण ठार, तर ४० जण जखमी झालेत.
यवतमाळ जिल्ह्यातील काही भाविक देवदर्शनासाठी आंध्रप्रदेशमध्ये जात असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. ट्रॅक्टरमधून आंध्र प्रदेशात हे सर्वजण देवदर्शनासाठी निघाले होते.

एका वळणावर ट्रॅक्टर पलटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांची अद्याप ओळख पटली नव्हती.

First Published: Sunday, March 31, 2013 - 13:12
comments powered by Disqus