आम्ही बापाचे बाप, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आम्ही ‘आप`चे बाप आहोत हे विधान केलं होतं. त्यावर उत्तर देत आयपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. आठवले म्हणतात, आम्हाला ‘आप`चा बाप होऊन ‘पाप` करायचे नाही. तुम्ही ‘आप`चे बाप असाल, तर आम्ही बापाचे बाप आहोत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 15, 2014, 01:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आम्ही ‘आप`चे बाप आहोत हे विधान केलं होतं. त्यावर उत्तर देत आयपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. आठवले म्हणतात, आम्हाला ‘आप`चा बाप होऊन ‘पाप` करायचे नाही. तुम्ही ‘आप`चे बाप असाल, तर आम्ही बापाचे बाप आहोत.
तर नामांतराच्या मागणीसाठी रामदास आठवलेंसोबत मीही कारागृहात होतो. आता ते आमच्या महायुतीत आले आहेत. आम्ही जेवढ्या दिमाखानं भगवा फडकवू तेवढ्याच अभिमानानं निळा झेंडा खांद्यावर घेऊ, असं प्रतिपादन भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (ए)मंगळवारी रात्री जाहीर सभा झाली. त्यावेळी मुंडे बोलत होते. तर रामदास आठवले पुढं म्हणाले, की आम्हाला दलितांना न्याय देण्यासाठी सतत संघर्ष करायचा आहे. राहुल गांधी पंतप्रधान होण्यास तयार झाल्याचं सांगितलं जातं. ते जरी तयार असलं तरी या देशातील जनता त्यांना पंतप्रधान म्हणून पाहायला तयार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.