चोरट्यांनी एटीएमसह सीसीटीव्ही कॅमेरेही केले लंपास!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, November 13, 2013 - 19:47

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये एटीएम उघडण्याचं गोपनीय कोड हॅक करून दोन चोरट्यांनी शिताफीनं १६ लाख १७ हजार रुपये पळवले. चोरट्यांनी कोड हॅक करून सफाईदारपणे रक्कम लांबवली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चित्रपटांमध्ये आपण हायटेक चोरी पाहतो. अगदी धूम चित्रपटातील चोरी पाहिल्यावर खरंच हे शक्य आहे का? असा प्रश्नही पडतो. एटीएममध्ये पैसै टाकण्यासाठी १२ अंकांचा कोड असतो त्यातील सहा अंक बँकेच्या अधिकाऱ्यांना तर सहा अंकी कोड पैसै भरणाऱ्या कंपनीच्या
अधिकाऱ्यांना माहित असतो.
एकमेकांना आपला कोड नंबर न सांगता मशीनमध्ये कॅश अपलोड करण्याची पद्धत अवलंबली जाते. मात्र, चोरट्यांनी अंत्यत शिताफीनं हे कोड हॅक केले आणि एटीएममधील १६ लाख १७ हजार १०० रुपयांची रक्कम लंपास केली. तसंच एटीएम मशीनमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही
कॅमेऱ्याची हार्डडिस्कही पळवली.
अत्यंत सेफ समजलं जाणारं एटीएम मशीनचे कोड चोरांनी हॅक केल्यामुळं राज्यातील सर्वंच बँकेतील एटीएम यंत्रणा धोक्यात आली आहे. सध्या या प्रकरणी दोघांना अटक झाली असली तरी या हायटेक चोरीमागं नक्की आहे तरी कोण? हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013 - 19:47
comments powered by Disqus