अजित पवार नालायक, हाकालपट्टी करा - उद्धव

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, April 7, 2013 - 14:38

www.24taas.com, औरंगाबाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवारांना शिवांबू पाजली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना थोडी तरी लाज असेल, तर ते उपमुख्यमंत्री पदावरून त्यांची हाकालपट्टी करतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
कमरेखालचे विनोद करत अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली. तर लोडशेडिंगवरही अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले. म्हणे लाईट नसल्यामुळेच वाढतेय लोकसंख्या. तो देशमुख का कुणीतरी आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय... ५५ दिवस झाले... काय झालं? सुटलं का पाणी? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुतता का तिथे आता? अवघड आहे बाबा? (हशा...) अशा शब्दात खिल्ली उडविली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचा समाचार घेतला.

राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू उत्तर महाराष्ट्र दौ-यावर आहेत. मालेगावात उद्धव ठाकरेंनी अजितदादांची टगेगिरी सुरूच असल्याचा टोला हाणला. दरम्यान, अजित पवारांना ही भाषा शोभत नाही असं मत सोलापूरचे आंदोलक भैय्या देशमुख यांनी व्यक्त केलंय. अजित पवारांनी आपल्या भाषणात देशमुखांचीच टर उडवलीय.

First Published: Sunday, April 7, 2013 - 14:38
comments powered by Disqus