जालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सुरुवात होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2013, 10:14 AM IST

www.24taas.com, जालना
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सुरुवात होत आहे.
मराठवाडा शिवसेनेचा नेहमीच गड राहिलाय. त्यामुळं हा गड भक्कम करण्याच्या दृष्टीनं आणि शिवसैनिकांमध्ये संजीवनी फुकण्यांसाठी उद्धव ठाकरेंची ही सभा महत्वाची आहे. परंतू मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच जालन्यात दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या स्थितीवर नव्या आदोंलनाचे तर उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार नाही ना याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. चारा छावण्या उघडाव्या, शेतक-यांना कर्जमाफी मिळावी, रोजगार हमीची काम सुरु करावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात येतील. अशी शक्यता आहे.
राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचे संकेत मुलाखतीतून दिल्यानंतर राज ठाकरेंनी सध्या तरी यावर मौन बाळगलंय. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील शिवसैनिकांनीही कंबर कसली आहे.